
बेळगाव : श्री मंगाई देवी युवक मंडळ-मंगाई देवस्थान या मंडळातील दोन शालेय विद्यार्थिनींनी दिपावलिनिमीत्त एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवला. स्फुर्ती विश्वनाथ सव्वाशेरी (ई. 7 वी बालिका आदर्श स्कूल) राहणार वडगाव व प्रणाली परशराम कणबरकर (ई.10वी डिवाईन मर्सी) राहणार मच्छे या दोन विद्यार्थिनींनी त्यांना शिवजयंती उत्सवावेळी मंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या बक्षिसाचा सदुपयोग करत जुने बेळगाव येथील महानगरपालिकेच्या निराश्रीत केंद्रामध्ये दिपावलीचा सण साजरा केला.
केंद्रातील सदस्यांच्या वतीने दिवाळी निमीत्त भारतमाता पुजन, दिपोत्सव कार्यक्रम व रात्री भोजनाचा आस्वाद असा सुंदर कार्यक्रम संपन्न झाला.
श्रेया सव्वाशेरी यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विनोद शानबाग, रमेश धोत्रे, समुदाय संघटना अधिकारी प्रकाश मरीकट्टी तसेच केंद्र प्रमुख रावसाहेब शिरहट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta