Friday , March 6 2026
Breaking News

उद्याचा काळा दिन गांभीर्याने पाळा; समितीचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : काळ्यादिनाच्या निषेध फेरीतून मराठी भाषिकांनी आपली ताकद दाखवावी, असे आवाहन माध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आली असून बेळगांव शहरासह संपूर्ण सीमाभागात काळा दिन गांभीर्याने पाळण्यात येणार आहे.
1956 साली भाषावार प्रांतरचना करण्यात आली व मराठी बहुभाषिक असलेला सीमाभाग तत्कालीन म्हैसूर राज्यात डांबण्यात आला. मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ मराठी भाषिक 1 नोव्हेंबर हा काळा दिन सुतक दिन म्हणून पाळण्यात येतो. मागील दोन वर्षांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निषेध मोर्चा व सायकल फेरी काढण्यात आली नव्हती. मात्र यावर्षी भव्य प्रमाणात निषेध मोर्चा काढून मराठीची ताकद दाखविण्यात येणार आहे.
बेळगांव शहरासह तालुक्यातील समितीप्रेमी मराठी भाषिक हजारोंच्या संख्येने सहभागी होण्यासाठी संभाजी उद्यान येथे दाखल होणार आहेत. या निषेध फेरीला महाराष्ट्रातून नेते उपस्थित राहणार आहेत तसेच शिवसेना, युवा समिती, तालुका युवा आघाडी, महिला आघाडी, विविध युवक मंडळे संघटनांनी निषेध मोर्चाला आपला पाठिंबा दर्शविला आहे.
सकाळी 9 वाजता संभाजी उद्यानातून निषेध फेरीला सुरवात होणार असून शहराच्या विविध भागातून मराठा मंदिरात फेरीची सांगता होणार आहे. त्यानंतर नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *