Friday , March 6 2026
Breaking News

अभाविपची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Spread the love

 

बेळगाव : अभाविपच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी बेळगावात निदर्शने करून सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील थकीत शिष्यवृत्ती तात्काळ जाहीर करावी, अशी मागणी केली.

दरवर्षी शिष्यवृत्तीसाठी लाखो गरीब आणि हुशार विद्यार्थी अर्ज करतात. शिष्यवृत्तीचीही रक्कम त्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त ठरते. मात्र अर्ज केल्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये शिष्यवृत्ती जाहीर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा आणि विद्यार्थ्यांना तात्काळ शिष्यवृत्ती जाहीर करावी. तसेच शिष्यवृत्ती घोटाळ्याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी करत शुक्रवारी अभाविपच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.
यावेळी अभाविपचे पदाधिकारी रोहित उमनाबादीमठ, संदीप दंडगल, रोहित अलकुंटे, प्रीतम उपरी यासह अनेक विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *