बेळगाव : बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रांमध्ये अनेक रस्ते मोठमोठे खड्डे पडून खराब झाले आहेत. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष धुमसत आहे.
भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने सेवाही समर्पण या अभियानाच्या अंतर्गत अनेक सेवा कार्य हाती घेण्यात आली आहेत. 5-6 दिवसापूर्वी बेळगुंदी येथील चार किलोमीटर रस्ता खड्डे बूजवून रहदारीला अनुकूल करून देण्यात आला होता. पुन्हा आज भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने बेक्कीनकेरे रस्ता खड्डे बूजवून दुरुस्त करण्यात आला. या रस्त्यावर अनेक वेळेला अपघात होऊन बरेच जण जखमी होत आहेत. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण क्षेत्रांमध्ये प्रचंड दुरावस्था निर्माण झाली आहे. भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळ आपल्यापरीने श्रमदानातून अनेक ठिकाणी रस्ते दुरुस्ती पासून ते आरोग्य तपासणी, रक्तदान, स्वच्छता, अभियान आदी कार्यक्रम हाती घेत आहे. बेक्कीनकेरे रस्ता दुरुस्तीचे कार्य मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी आमदार मनोहर कडोलकर, मंडळ सरचिटणीस पंकज घाडी, मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष लींगराज हिरेमठ, गणपतराव देसाई, मल्लापा कांबळे, नितीन देसाई, दादा गावडे, नेताजी बेनके, दयानंद भोगन, कार्यालय कार्यदर्शी नारायण पाटील, गुरु हलगत्ती, प्रसाद बाचीकर, मंगेश मोरे, भरर्म गोमानाचे, पवन देसाई, आदीसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.
