बेळगाव : काल सोमवार दि. 7/11/2022 रोजी सायंकाळी 6.00 वाजता मराठा सेवा संघ बेळगांवची बैठक मराठा सभागृह, गणेश कॉलनी छत्रपती संभाजी नगर वडगांव बेळगांव येथे संपन्न झाली. बैठकी मध्ये मराठा उद्योजक, व्यवसायिक, व्यापारी आणि ग्राहक मेळावा बेळगांवमध्ये घेण्यासाठी चर्चा करून मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर करण्याचे ठरले. बैठकीमध्ये मराठा सेवा संघ शिवधर्म दिनदर्शिका 2023, मराठा सेवा संघ बेळगांवचे बॅंक खाते चालू करणे. प्रत्येक गावामध्ये स्पोकन इंग्लिश क्लास चालू करणे आणि मराठा सेवा संघाचे इतर पदाधकाऱ्यांची नेमणूक करणे ह्या सर्व विषयावर मराठा सेवा संघाचे बेळगांव अध्यक्ष शिवश्री किरण धामणेकर यांनी समाज बांधवांना महिती देऊन मार्गदर्शन केले, बैठकीला आर्किटेक्ट शिवश्री आनंद काटकर सर. उद्योजक शिवश्री धाकलू करविनकोप, सिव्हील इंजिनिअर शिवश्री दिपक कोले, कुमार नितेश धामणेकर, कुमार नवजीत पोटे, कुमार किरण नद्याळकर, काँट्रकटर – शिवश्री हणमंत मेलगे, शिवश्री मधू मुचंडी, शिवश्री रमेश खेमनाळकर, शिवश्री मारुती तुळजाई, शिवश्री अरुण कुंडेकर, शिवश्री मधू पाटील, शिवश्री वैजनाथ होनगेकर, शिवश्री नारायण पाटील, शिवश्री प्रकाश अनगोळकर आदी. समाज बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta