
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातून देखील मराठी भाषा हद्दपार होणार आहे. महानगर पालिकेने पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाची तयारी सुरू केली आहे. अंदाजपत्रकाबाबत बेळगावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, अर्थतज्ञ, चार्टर्ड अकाऊंटंट तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सूचना व सल्ला देण्याचे आवाहन केले आहे. पण या सूचना इंग्रजी व कन्नड भाषेतच देण्यात याव्यात असे महानगरपालिकेने म्हंटले आहे. त्यामुळे मराठी भाषिक तज्ज्ञांनी सल्ला किंवा सूचना द्यावी की नाही?असा प्रश्न मराठी भाषिकांना पडला आहे.
बेळगावात बहुभाषिक मराठी जनता आहे. विद्यमान नगरसेवक देखील बहुसंख्य मराठीच आहेत. मात्र महापालिकेला मात्र सल्ला व सूचना या केवळ कन्नड व इंग्रजी भाषेतूनच हव्यात याबाबतचे अधिकृत पत्रक महानगर पालिकेने प्रसिद्ध केले आहे. नागरिकांनी आपल्या सूचना लेखी स्वरूपात मुख्य लेखाधिकाऱ्यांकडे जमा कराव्यात किंव्हा इ-मेलच्या माध्यमातून पाठविण्यात याव्या, असे आवाहन केले आहे.
दरवर्षी अंदाजपत्रक मंडण्यापूर्वी महानगरपालिकेकडून शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची माजी लोकप्रतिनिधींची विविध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाते. त्यांच्याकडून आलेल्या सूचनांचा समावेश अंदाजपत्रकात करण्यात येतो. मागील साडेतीन वर्षांपासून पालिकेत प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे अंदाजपत्रक प्रशासनाकडून मंजूर केले जाते. पण प्रशासनाने या बैठकीचे आयोजन केले आहे. पालिकेत अद्यापही लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आलेले नाही. 31 मार्चपूर्वी सभागृह अस्तित्वात आले तर अर्थ स्थायी समिती अध्यक्ष अंदाजपत्रक मांडतील व तसे न झाल्यास य सलग चौथा अर्थसंकल्प प्रशासकांकडून मांडला जाईल.
Belgaum Varta Belgaum Varta