बेळगाव : नोव्हेंबर 18, 19 व 20 असे तीन दिवस दुपारी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत रामनाथ मंगल कार्यालय, टिळकवाडी येथे खाद्य जत्रा/ ‘आनंद मेळा’चे आयोजन शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे केले जाणार आहे. विविध चटपटीत व रुचकर शाकाहारी तसेच मांसाहारी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन मनपसंद कपड्यांच्या तसेच अनेक आकर्षक वस्तूंच्या खरेदीचा आनंद लुटण्यासाठी भरगच्च असे साठ स्टॉल्स असणार आहेत. आयोजनात गृहिणींचा पुढाकार असल्याने रुचकर व घरगुती जेवण ही आनंद मेळाची खासियत असणार आहे. इतकेच नव्हे तर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नृत्य व गायन स्पर्धांचे आणि महिलांसाठी फॅशन शोचे आयोजन केले आहे. कराओके वर गाण्याच्या सादरीकरणाची संधी असेल. लहान मुलांना प्रवेश मोफत असून त्यांना खेळ व मनोरंजनासाठी वेगळी जागा असणार आहे. तरी भरपूर करमणूक, खरेदी व चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी सपरिवार आनंद मेळाव्यास येण्याचे आवाहन शारदोत्सव महिला सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta