कोल्हापूर : बेळगावहून रत्नागिरीला जाणाऱ्या बसला अपघात होऊन भीषण आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
केए 22 एफ 2065 क्रमांकाची बस कोल्हापूर-रत्नागिरी दरम्यान जाधववाडी येथे खड्ड्यात पडून बसला आग लागली. बसमध्ये 13 प्रवासी प्रवास करत होते. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
पादचाऱ्याला टाळण्याच्या प्रयत्नात ही बस खड्ड्यात पडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. बसची मागील काच फोडून प्रवाश्यांना बाहेर काढण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta