Friday , March 6 2026
Breaking News

प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांना राज्यस्तरीय सत्यशोधक-2022 पुरस्कार जाहीर

Spread the love

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : 28 नोव्हेंबर हा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी शिक्षण आणि समाज परिवर्तनामध्ये मूलभूत व क्रांतिकारी कार्य केले आहे. त्यांच्या विचारांना आदर्श मानून शिक्षण व जनसेवेच्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करीत असलेले बेळगाव (कर्नाटक) येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांना सामाजिक बांधिलकी मानून करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय सत्यशोधक – 2022 पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्काराचे वितरण सोमवार दि. 28 नोव्हेंबर, 2022 रोजी सायं. 5:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, लेखक व समीक्षक प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण, हातकणंगले लोकसभा मतदान संघाचे खासदार धैर्यशील माने, माजी आमदार राजीव आवळे या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच, कोल्हापूरचे अध्यक्ष व प्रकाशक अनिल म्हमाने आणि डॉ. शोभा चाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकानी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *