Tuesday , December 9 2025
Breaking News

उद्यापासून नंदिनी दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ : केएमएफ अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी

Spread the love

 

बेळगाव : नंदिनी दूधाचे दर प्रतिलीटर 2 रुपयांनी वाढणार आहे. ही दरवाढ उद्यापासून लागू होणार असल्याची माहिती केएमएफचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दरवाढीसंदर्भात निर्णय घेण्यात आला असल्याचे भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितले.

दुग्धव्यवसायिक शेतकरी अडचणीत असल्यामुळे सदर दरवाढ ही पूर्णपणे शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.शेतकऱ्यांच्या मदतीला केएमएफ सदैव असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दररोज 77 लाख लिटर दुध संकलन होते आणि 50 लाख लिटरची विक्री होते उर्वरित 27 लाख लिटर दुधाचे इतर पदार्थ बनविले जातात यातून मिळणारा नफा शेतकऱ्यांकडे वर्ग करण्याचा विचार सुरू असल्याचेही जारकीहोळी यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *