बेळगाव : सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीची यात्रा मंगळवार दि. 19 ऑक्टोबर रोजी होत असून यादिवशी प्रशासनाने कोरोना नियमांच्या चौकटीत सौंदत्ती येथील यल्लम्मा देवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करून घ्यावे तसेच यात्रेस अनुमती द्यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शिवसेना रिक्षासेनेच्यावतीने करण्यात आली.
कोल्हापूर जिल्हा शिवसेना रिक्षासेना प्रमुख राजेंद्र शंकरराव जाधव यांनी सदर मागणीचे निवेदन बेळगाव जिल्हा निवासी जिल्हाधिकारी अशोक दुरदुंटी यांच्याकडे सादर केले.
सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो भाविक येतात. मात्र, मागील दोन वर्षे कोरोनो आपत्तीमुळे मंदीर बंद ठेवून सलग दोन वर्षे यात्रा रद्द केली होती. सध्याची परिस्थिती पाहता कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे. याचा विचार करून सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीचे मंदीर देखील कोरोना नियमांचे पालन करून दर्शनासाठी खुले ठेवावे तसेच नियमाच्या चौकटीत यात्रेला अनुमती द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
कोरोना करिता असलेल्या इतर नियमांबरोबर ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत अशा लोकांसाठी यात्रेत सहभागी होण्यास परवानगी द्यावी.
त्यामुळे स्थानिक रोजगारास चालना मिळेल व अनेक भक्तांनाही दर्शनाचा लाभ होईल, असे सांगत 19 रोजी सौंदत्ती येथील यल्लम्मा देवी यात्रेसाठी कायदेशीर बाबी पाळून प्रशासनाने यात्रेस परवानगी द्यावी, अशी विनंती कोल्हापूर शिवसेना रिक्षासेना जिल्हा प्रमुख राजेंद्र शंकरराव जाधव यांनी निवेदनाद्वारे बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
निवेदन देताना बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, जिल्हा संघटक रवींद्र जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक महेश टंकसाळी, म. ए. समिती युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष सुरज कुडूचकर, अंकुश केसरकर, शिवसेना विभाग प्रमुख प्रसाद काकतकर, विभाग प्रमुख राजू कणेरी, कोल्हापूर रिक्षासेनेचे अनिल जाधव, उमेश मेढे, मोहन बागडी, रितेश जाधव, विक्रम आमगावकार यासह इतर शिवसैनिक उपस्थित होते.
Check Also
राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेची हिंडलगा, येळ्ळूर व खानापूर केंद्रावरील तयारी पूर्ण
Spread the love येळ्ळूर : ८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य मंचच्या वतीने रविवार दि. …