शिवसेना बळकटी संदर्भात दिल्या सल्ला-सूचना
बेळगाव : कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख आणि मुंबई बेस्टचे माजी चेअरमन अरुण दुधवाडकर यांनी आज बेळगावला धावती भेट दिली.
मुंबईहून विमानाने बेळगावला दाखल झालेल्या अरुण दुधवाडकर यांचे बेळगाव विमानतळावर बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी अरुण दुधवाडकर यांनी जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्याशी बेळगाव जिल्हा शिवसेना संघटन बांधणी संदर्भात चर्चा केली. तसेच जिल्हा शिवसेना बळकटीसंदर्भात सल्ला – सूचना दिल्या.
याप्रसंगी कोल्हापूर शिवसेना शहर प्रमुख आणि माजी उपमहापौर रवी इंगवले, कोल्हापूर जिल्हा रिक्षा सेना प्रमुख राजू जाधव, जिल्हा संघटक रवींद्र जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक महेश टंकसाळी, मजगाव विभाग प्रमुख प्रसाद काकतकर, शहापूर विभाग प्रमुख राजू कणेरी यासह बेळगाव शिवसेनेचे अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक तसेच कोल्हापूर जिल्हा शिवसेना रिक्षा सेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
Check Also
भारत विकास परिषदेच्या “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा अपूर्व उत्साहात संपन्न
Spread the love बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा जीजीसी …