उचगाव : मण्णूर येथील अभियंते व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी बेळगाव जिल्ह्यात काळाच्या ओघात दुर्लक्षित असलेल्या सडा किल्ल्याच्या संवर्धनासाठी मदतनिधी देऊन हातभार लावला आहे.
येथील छत्रपती शंभूराजे परिवार बेळगाव विभागाच्यावतीने सडा किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी छत्रपती शंभूराजे परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित दुर्गसंवर्धन मोहीम येत्या २४-२५ डिसेंबर रोजी आयोजित केली आहे. यादरम्यान संपूर्ण किल्ला परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या दुर्गसंवर्धन मोहिमेच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी कटींग मशीनसाठी मदत निधी देऊन सहकार्य केले. त्याबद्दल संघटनेच्या वतीने श्री. चौगुले यांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta