Friday , March 6 2026
Breaking News

सीमाप्रश्नी 30 नोव्हेंबर रोजी सुनावणी!

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी 30 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान कर्नाटक सरकारने दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्राचे ऑन रेकॉर्ड वकील शिवाजीराव जाधव यांनी शुक्रवारी सीमाप्रश्नी तातडीने सुनावणी घेण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या आनुषंगाने 30 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. कर्नाटकाने सीमाप्रश्नी दावा सर्वोच्च न्यायालयात चालू शकत नाही असा दावा दाखल केला आहे त्यावर आता 30 नोव्हेंबर रोजी ही सुनावणी होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती गैरहजर राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली होती.
30 नोव्हेंबर रोजी होणारी सुनावणी ही सीमावासीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ विधिज्ञ वैद्यनाथन यांची नियुक्ती केली आहे तर कर्नाटक सरकारने देखील वकिलांचा अतिरिक्त फौजफाटा तयार केला आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबर रोजी होणारा युक्तिवाद अतिशय महत्वाचा ठरणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

कडोलीत उद्या मराठी भाषा गौरव दिवस

Spread the love  कडोली : येथील मराठी साहित्य संघातर्फे शनिवार दि. 7 मार्च 2026 रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *