बेळगाव : मुंबई येथे नुकत्याच झालेल्या सीमाप्रश्नी उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत चंद्रकांत दादा पाटील आणि शंभूराजे देसाई या दोघांची सीमा समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या दोघांनाही मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पत्र लिहून बेळगाव दौरा करून कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, अशी विनंती वजा मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात असलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्नाच्या खटल्याची सुनावणी 30 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्या प्रश्नावर दोन्ही समन्वयक मंत्र्यांनी या प्रश्नासंदर्भात बेळगाव येथील कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, अशा आशयाचा तपशील असणारे पत्र मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या स्वाक्षरीसह पाठवण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta