बेळगाव : बेळगावात अपघातांची भीषण मालिका घडली असून, तीन कार दुभाजकाला धडकून एका लॉरीवर आदळून पलटी झाल्याची घटना वंटमुरी घाटाजवळ घडली.
बंगळुरू-पुणे राष्ट्रीय महामार्ग 4 वर हा अपघात झाला. या अपघातात 7 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातांच्या मालिकेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
बेळगावच्या डीसीपी स्नेहा यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta