बेळगाव : सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराजे देसाई हे 3 डिसेंबरला बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. बेळगावमध्ये सीमावासीयांच्या भावना जाणून घेण्यासाठी येणाऱ्या उभय मंत्र्यांच्या बेळगावमधील दौऱ्याचा तपशील बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाला आहे.
3 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन पार पडणार आहे.
त्यांनतर 11.30 वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. यानंतर 11.55 च्या दरम्यान रामलिंग खिंड गल्ली येथील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यालयाला भेट देऊन पुढे तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे प्रस्थान करणार आहेत.
यानंतर समिती नेते प्रकाश मरगाळे यांच्या निवासस्थानी जाऊन तिथून पुढे हुतात्मा मधू बांदेकर आणि विद्या शिंदोळकर यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यात येणार आहे. यानंतर सुळगा, उचगाव, विजयनगर, बेळगुंदी आणि कंग्राळी खुर्द याठिकाणी त्यांचा दौरा आहे.
ओरिएंटल सभागृहात होणार कार्यक्रम
दरम्यान मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे ओरिएंटल सभागृहात समिती नेते कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत अशीही माहिती उपलब्ध झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta