बेळगाव : मतदार यादी पडताळणी सध्या सुरू आहे. बेळगावच्या मतदारांनी ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे कारण दक्षिण विभागातील बहुसंख्य नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत. हे अलीकडेच होत आहे असे नाही तर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून जाणीवपूर्वक ही नावे गहाळ करण्याचे प्रकार घडत आहेत. मतदारांनी दिलेल्या मुदतीत आपल्या नावांची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन केपीसीसी सदस्या सरला सातपुते यांनी केले आहे.
जे लोक भाजपा विरोधात आहेत त्यांची पद्धतशीरपणे माहिती घेऊन हेतुपुरस्सर त्यांची नावे मतदार यादीतून नांवे वगळण्यात येत आहेत. मतदारात जागृती करणे गरजेचे आहे. बेळगावच्या मतदारांनी आपले नाव यादीमध्ये आहे की नाही याची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन सातपुते यांनी केले आहे.
याबाबत आपलाच अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी उमेदवार होते. त्यावेळी बहुसंख्य काँग्रेसप्रणित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती. इतकेच नव्हे तर भाजप नेते मतदान कक्षात येऊन निवडणूक अधिकारी पोलीस, कर्मचारी यांच्या खांद्यावर हात ठेवून मत देण्यासाठी आग्रह करीत होते आणि त्यांना जुमानले नाही तर दबाव आणत होते हे मी स्वतः पाहिले आहे.
ईव्हीएम व व्हीव्हीपॅड मशीनद्वारे मतदान करणे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वागतार्ह होते. परंतु हे मशीन हॅक केले जाते. महानगरपालिका निवडणुकीत याचाच फटका समितीला झाला आहे. भाजपला विरोध असताना सुद्धा बहुसंख्य मताने भाजपा उमेदवार निवडून याने हे सखेद आश्चर्य आहे. ही निवडणूक पारदर्शक झालेली नाही त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान केले जावे अशी मागणी आम्हाला नाईलाजाने करावी लागत आहे.
एका मताने के फरक पडतो असे म्हणू नका. कारण एका मताने ही फरक पडतो त्यामुळे मतदारयादीत आपले नाव आहे की नाही याची पडताळणी आवश्य करा. कोणत्याही परिस्थितीत मतदानाचा अधिकार सोडू नका. असे सांगत निवडणुकीदरम्यान तुम्हाला घरे मंजूर करून देतो. पीआयडी नंबर मिळवून देतो. विविध सवलती देतो असे सांगणाऱ्याना थारा देऊ नका। कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन सरला सातपुते यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta