मुंबई : ठाण्याचे पत्रकार साहित्यिक व सीमा चळवळीतील कार्यकर्ते विष्णू जाधव यांनी सीमा समन्वयक मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे बेळगावसह संपूर्ण सीमावासीयांना महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर सातत्याने लेखन करणारे दारू-नाशमुक्ती चळवळ चालविणारे साहित्यिक /पत्रकार अर्जुन जाधव यांनी नुकताच समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई यांना लेखी निवेदन दिले. यामध्ये बेळगाव, बिदर, भालकी, कारवारसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ठ करून नव्याने संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यात यावा. गेली 65 वर्षे येथील मराठी जनता महाराष्ट्रात येण्यासाठी लढते आहे. त्यांचा हा लढा कर्नाटक सरकार दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सीमाभागातील मराठी जनतेवर कर्नाटक सरकार सतत अत्याचार करत आहे. सीमालढ्यातील तरुणांना खोट्या आरोपाखाली तुरुंगात डांबण्यात येते. या सर्व त्रासातून सीमाभागातील मराठी बांधवांना मुक्त करून महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात निर्णायक वळणार आहे त्याचा लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पत्रकार अर्जुन जाधव यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta