बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये कपिलेश्वर मंदिराची कुलस्वामिनी या मूर्तीचा अनावरण सोहळा संपन्न झाला. बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांच्या हस्ते कुलस्वामिनी मूर्तीचे अनावरण झाले. यावेळी मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांचा सत्कार मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री व सतीश निलजकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मूर्तीकार वसंत पाटील, विनायक डेकोरेटरचे विनायक पालकर, लाईट आणि पोगो साऊंड सिस्टिम अभी पवार यांचा सत्कार श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, राहुल कुरणे, विवेक पाटील, दौलत साळुंखे, राकेश कलघटगी, दौलत जाधव, विनायक मनगूतकर, अविनाश खनुकर, संजय मणगूतकर, सचिन आनंदाचे आदी ट्रस्टी सेवेकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta