कोल्हापूर : कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय आणि छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांवर भाजप नेत्याकडून वेळोवेळी होणाऱ्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
कोल्हापूर शहरातील शाहू समाधी स्थळ या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, शिवसेना नेते अरूण दुधवाडकर यांच्यासह सीमाभागतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते उपस्थित असणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहील आहे. सकाळी 10 वाजता हे धरणे आंदोलन सुरू होणार आहे.