Sunday , July 26 2026
Breaking News

कोगनोळी येथे चार एकर ऊसाच्या फडाला आग

Spread the love

 

कोगनोळी : येथील हणबरवाडी रोडवर असणाऱ्या जगताप मळ्यात चार एकर ऊसाच्या शेतीला अज्ञाताकडून पेटवून दिल्याची घटना गुरुवार तारीख 8 रोजी दुपारी 4 च्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हणबरवाडी रोडवर मानव महादेव जगताप यांची सर्वे नंबर 336 मध्ये चार एकर ऊसाची शेती आहे. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास अचानक ऊसाने पेट घेतल्याचे दिसून आले. मानव जगताप, मनेश जगताप व अन्य शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. यावेळी बोलताना मानव जगताप यांनी शेताजवळून किंवा शेतावरून कोणत्याही प्रकारची विद्युत वाहिन्या गेल्या नाहीत. तरीपण ऊसाच्या फडाला आग लागली आहे. जाणून बुजून कोणीतरी अज्ञाताने आग लावली आहे. यामुळे आपले लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगितले.
सदर चार एकर ऊसाची नोंद छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास आहे. घटनास्थळी छत्रपती शाहू साखर कारखान्याचे गट विकास अधिकारी अविनाश मगदूम व सहकार्याने भेट देऊन पाहणी केली.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *