Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव -धारवाड नवीन रेल्वेमार्ग विरोधात शेतकऱ्यांचे विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांना निवेदन

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव-धारवाड नवीन होणाऱ्या रेल्वे मार्गाच्या विरोधात गर्लगुंजी, नंदीहळ्ळी, केके कोप आदी गावच्या शेतकऱ्यांरनी बेळगाव येथे आलेल्या विशेष भूसंपादन अधिकारी ममता होसगौडर यांना निवेदन देऊन आपली गाऱ्हाणी मांडली.
यावेळी देसुर मार्गे धारवाडला जाणाऱ्या रेल्वे मार्गााठी देसुर, गर्लगुंजी, राजहंसगड, नंदीहळ्ळी, केके कोप आदी गावच्या शेतकऱ्यांची दोन पिकाची पिकाऊ जमिन कोणत्याही परिस्थितीत आपली एक इंच जमिन रेल्वे मार्गासाठी देणार नाही. एवढेच नव्हे तर केडीबी अधिकारी अथवा कॉन्ट्रॅक्टर यांना पाय ठेवू देणार नाही, असा आक्षेप निवेदनात नोंदविला.
यावेळी निवेदनाचा स्विकार विशेष भूसंपादन अधिकारी ममता होसगौडर यांनी करून रेल्वे बोर्ड व मुख्यमंत्र्यांना कळवितो, असे आश्वासन दिले.
निवेदन देताना गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील, नंदीहळ्ळी माजी तालुका पंचायत सदस्य मारूती लोकूर, परशराम कोलकार, संगाप्पा कुंभार, पुंडलिक मेलगे, सुभाष कुंभार, श्रीकांत पाटील, शिवाजी पाटील, संजय सिध्दाणी, परशराम जाधव, आप्पाजी पाटील, किरण लोंढे, राजेंद्र पाटील, रामदास जाधव, सुधाकर पाटील, आदी शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *