बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे माजी निवासी जिल्हाधिकारी बुद्याप्पा एच. बी. यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. किडणीच्या विकाराने गेली दोन वर्ष ते आजारी होते. त्याचबरोबर वर्षभर ते कोमामध्येच होते.
त्यांच्यावर बंगळूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. बंगळूरमध्ये समाजकल्याण विभागात ते कार्यरत होते. त्यांनी बेळगाव जिल्ह्यात दोन वर्षे निवासी जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली. दोन वर्षापूर्वी त्यांची बंगळूरला बदली झाली होती.
Belgaum Varta Belgaum Varta