बेळगाव : समितीच्या वतीने दि.19 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या महामेळाव्याद्वारेच कर्नाटक सरकारला उत्तर देऊ आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात जाण्याचा वज्र निर्धार येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे.
19 डिसेंबर रोजी कर्नाटक विधी मंडळाच्या अधिवेशन विरोधी महामेळाव्यासाठी पाठिंबा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मोठ्या संख्येने येळ्ळूरवासीय महामेळाव्यात सहभागी होतील असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी शांताराम कुगजी, दुद्दाप्पा बागेवाडी, प्रकाश अष्टेकर, विलास घाडी, राजू पावले, रमेश मेनसे, प्रकाश पाटील, दशरथ घाडी, अनंत पाटील, कृष्णा शहापूरकर, परशराम परीट, दत्ता उघाडे, शिवाजी देसाई, जोतिबा चौगुले, तानाजी पाटील, आनंद घाडी, प्रकाश मालुचे आदि उपस्थित होते.
हिंडलगा येथून महामेळाव्यास पाठिंबा
19 डिसेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास पाठिंबा देण्याचा निर्धार हिंडलगा येथे करण्यात आला आहे. यावेळी रामचंद्र कुद्रेमनीकर,अनिल हेगडे, विनायक पावशे, सुरेश आगसगेकर, संदीप मोरे, नागेश किल्लेकर, यल्लापा काकतकर, अरुण कुडचीकर, संदीप कुडचीकर, योगेश कडोलकर, सतिश नाईक आदी उपस्थित होते.
दरम्यान, कोरे गल्ली शहापूर येथील श्री गंगापुरी मठात महामेळाव्याबाबत जनजागृती करण्यात आली. आगामी 19 डिसेंबर रोजी कर्नाटक विधी मंडळाच्या अधिवेशन विरोधी महामेळाव्यास पाठिंबा व्यक्त करण्यात आला. शहापूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने ही जनजागृती करण्यात आली. यावेळी महादेव पाटील, सागर पाटील, सुनील बोकडे, अभिजित मजुकर, रणजित हावळानाचे, शिवाजीराव हावळानाचे, विशाल कंग्राळकर, भारत नाग्रोळी, गजानन शहापूरकर, शिवाजीराव उचगावकर, विक्रांत कंग्राळकर, विराज मुरकुंबी, राजू पाटील, आदी उपस्थित होते.