बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील हिंदू मंदिरांवर सरकारची वक्रदृष्टी पडली आहे. बेळगाव शहरातील दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरासह जिल्ह्यातील 49 मंदिरांवर व्यवस्थापन समिती स्थापन करण्यासंबंधी धर्मादाय विभागाने नोटीस दिली असून त्यामुळे मंदिर व्यवस्थापनात असंतोष पसरला आहे. बेळगाव येथील कपिलेश्वर देवस्थान, साई मंदिर, टिळकवाडी, होनगा येथील भैरव कलमेश्वर अश्वत्थ नारायण देवस्थान, मारुती देवस्थान केदनूर, लगमव्वा देवी देवस्थान केदनूर, ब्रह्मलिंग देव देवस्थान केदनूर, मारुती देवस्थान मोदगा, गिरिजादेवी देवस्थान कानशिनकोप्पसह हुक्केरी, निपाणी, चिकोडी, बैलहोंगल, कित्तूर, गोकाक, खानापूर, कागवाड तालुक्यातील 18 मंदिरांवर नऊ जणांची समिती स्थापन करण्यासंबंधी एक महिनापूर्वीपासून पत्रव्यवहार सुरू आहेत.
धर्मादाय विभागाने सर्व मंदिरांना पाठविलेल्या पत्रातील माहितीनुसार सी-प्रवर्ग देवस्थानात पुढील तीन वर्षांसाठी नऊ जणांची समिती स्थापन करण्यासंदर्भात अर्ज मागविण्यात आले आहेत. नोटीस लावल्यानंतर तीस दिवसांच्या आत अर्ज करण्याची मुदत आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक मंदिरांना आठ दिवसांपूर्वीच यासंबंधीच्या नोटिसा पोहोचल्या आहेत. 21 नोव्हेंबर 2022 रोजी सर्व मंदिरांच्या फलकावर लावण्यासाठी धर्मादाय विभागातून माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 31 ऑक्टोबर 2022 च्या जिल्हा धार्मिक परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.
पुजारी, अनुसूचित जाती-जमातीचे दोन सदस्य, दोन महिला, देवस्थान ज्या परिसरात आहे त्या परिसरातील एकजण व इतर चौघे अशी नवी कमिटी स्थापन करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. याला विरोध होत आहे. एकूण 49 मंदिरांमध्ये नवी समिती तीन वर्षांसाठी स्थापन करण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहेत.
नोटीस पाठविण्यात आलेली जिल्ह्यातील मंदिरे
कपिलेश्वर मंदिर (बेळगाव), साई मंदिर (बेळगाव), मारुती मंदिर (केदनूर), लगमव्वा देवी मंदिर (केदनूर), ब्रह्मलिंग मंदिर (केदनूर), मारुती मंदिर (मोदगा), गिरीजा मंदिर (कानशिनकोप्प), भैरव कलमेश्वर अश्वत्थ नारायण मंदिर (होगा), लक्ष्मी मंदिर (डोणेवाडी), बसवेश्वर मंदिर (मुगळी), मलिकार्जुन मंदिर (बंबलवाड), रेणुका मंदिर (खजनगौडनहळ्ळी), रामलिंगेश्वर देवस्थान (हनभरट्टी), बिरदेव देवस्थान (एमके हुबळी), बसवेश्वर मंदिर (खानापूर), भूवराह नरसिंह मंदिर (हलशी), संगमेश्वर देवस्थान (मोळवाड), लक्ष्मी मंदिर (नागरमुन्नोळी), ब्रह्मलिंग मंदिर (नागरमुन्नोळी), ब्रह्मलिंग देवस्थान (बेळगोड), हनुमान मंदिर (शिरगाव), मारूती देवस्थान (कोथळी), मल्लिकार्जुन देवस्थान (कोथळी), बसवेश्वर देवस्थान (कोथळी), मारूती देवस्थान (जोडकुरळी), नवहरी देवस्थान (गवाण), बसवेश्वर देवस्थान (दास्तीकोप), बसवेश्वर देवस्थान (चिक्कनंदिहळ्ळी), सातेरी देवस्थान (नेरसे), ग्रादेवीदेवस्थान (गुडदूर), मारूती `वस्थान (दुडदूर), वीरभद्र देवस्थान (लक्कुंडी), रामलिंगेश्वर देवस्थान (हणबरहट्टी), रामलिंग देवस्थान (बैलहोंगल), मसोबा देवस्थान (जक्कारट्टी).
Belgaum Varta Belgaum Varta