बेळगाव : नववर्षाच्या पूर्वसंध्येला 31 डिसेंबर रोजी बेळगाव जिल्ह्यात 7 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मद्याची विक्री झाली आहे. तळीरामांनी कोट्यावधी रुपयांचे मद्य रिचवले असून गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक प्रमाणात मद्याची विक्री झाली आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे अबकारी विभागाला उद्दिष्ट गाठता आले नाही. यंदा मद्यविक्रीचे उद्दिष्ट पार झाले आहे. एका दिवसात 5 कोटी 56 लाख रुपयांचे मद्य व 1 कोटी 49 लाख रुपयांच्या बियरची विक्री झाली आहे, अशी माहिती अबकारी अधिकाऱ्यांनी दिली.
अबकारी विभागात आता उत्तर आणि दक्षिण असे दोन जिल्हे करण्यात आले आहेत. प्रशासकीय दृष्टिकोनातून ही विभागणी झाली असून दक्षिण जिल्ह्यात बेळगाव, खानापूर, बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्गचा समावेश आहे. तर उत्तर जिल्ह्यात चिकोडी, गोकाक, हुक्केरी, अथणी, रायबागचा समावेश आहे. एका दिवसात 14800 बॉक्स मद्य व 8381 बॉक्स बियरची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी 4 कोटी 94 लाख रुपयांची मद्यविक्री झाली होती. यावर्षी 7 कोटांचा आकडा पार झाल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta