Tuesday , March 3 2026
Breaking News

तालुका आरोग्याधिकार्‍यांच्या निषेधार्थ बेळगावात निदर्शने

Spread the love

बेळगाव : ‘आयुष’ डॉक्टर्स हे बोगस डॉक्टर्स असल्याचे विधान तालुका आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तिहोळी यांनी केले आहे. त्याच्या निषेधार्थ आयुष फेडरेशनच्या बेळगाव तालुका शाखेतर्फे निदर्शने करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. बेळगाव तालुका आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तिहोळी यांनी एका वृत्तपत्राला ‘आयुष’ डॉक्टर्स हे बोगस डॉक्टर्स असल्याचे सांगितले होते. त्याच्या निषेधार्थ डॉ. मास्तिहोळी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आयुष फेडरेशनच्या बेळगाव तालुका शाखेतर्फे आयुष डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांना निवेदन दिले.या संदर्भात बोलताना आयुष फेडरेशनच्या बेळगाव तालुका शाखेचे अध्यक्ष पद्मराज पाटील म्हणाले, तालुका आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तिहोळी यांनी आयुष डॉक्टरांबाबत केलेले विधान चुकीचे आहे. आम्ही बोगस डॉक्टर नाही. 5 वर्षे वैद्यकीय महाविद्यालयात शिकून, प्रशिक्षण घेऊन वैद्यकीय सेवा देत आहोत. कोविड संकटातही सरकारच्या खांद्याला खांदा लावून लढलो आहोत. केपीएमए कायद्याचा गरवापर करून आता आयुष डॉक्टरांना त्रास देण्यात येत आहे. यासंदर्भात 10 वर्षांहून अधिक काळ सरकारशी लढत आहोत. मात्र अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सुरेश चौगुला, प्रवीण दोड्डण्णावर, विनोद पट्टण, आदिश्वर गनी यांच्यासह आयुष डॉक्टर्स उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *