Friday , March 6 2026
Breaking News

बेळगाव महापौर, उपमहापौर निवडणुकीला ग्रीन सिग्नल

Spread the love

 

बेळगाव : अखेर बेळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीला राज्य सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे.
यासंदर्भात नगरविकास विभागाच्या अधिन सचिवांनी बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तांना 9 तारखेला पत्र दिले.
21 व्या कार्यकाळासाठी शासनाने यापूर्वी निश्चित केलेल्या आरक्षणानुसारच, नियमानुसार निवडणुका घ्याव्यात, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. त्यानुसार बेळगाव महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी तर उपमहापौरपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे.
प्रादेशिक आयुक्त उद्या दि. 11 तारखेला महापौर, उपमहापौर निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची शक्यता जास्त आहे.

नगर विकास खाते व शहर विकास सचिवालयाने कर्नाटक राजपत्राद्वारे राज्यातील बेळगावसह बेळ्ळारी, बेंगळूर, दावणगिरी, हुबळी -धारवाड, कलबुर्गी, मंगळूर, म्हैसूर, शिमोगा, तुमकुर आणि विजापूर या महानगरपालिकांच्या महापौर व उपमहापौर पदाचे आरक्षण काल सोमवारी जाहीर केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *