बेळगाव : सकल मराठा समाजाचे संयोजक, भाजपाचे कर्नाटक राज्य ओबीसी सचिव किरण जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी, हितचिंतकांनी व कार्यकर्त्यांनी दिवसभरात त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. न्यू गुड्सशेड रोड येथील विमल अपार्टमेंटच्या कार्यालयात सकाळी 11 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. माजी मंत्री आमदार रमेश जारकीहोळी हे शुभेच्छा देण्यासाठी जातीने हजर होते. तसेच माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांनी देखील किरण जाधव यांना शुभाशीर्वाद दिले.
किरण जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील विविध आश्रमात अन्नदान करण्यात आले. कणबर्गी येथील महेश फौंडेशनच्या विद्यार्थ्यांना तसेच समन्वय ब्लाइंड स्कूल शाहूनगर येथे विमल फौंडेशनच्या वतीने अन्नदान करण्यात आले.
माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, भाजपचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी सी. टी. रवी, माजी आमदार संजय पाटील, खासदार मंगल अंगडी, आमदार अनिल बेनके, आमदार महेश कुमठळ्ळी, आमदार भालचंद्र जारकीहोळी, भाजपचे नेते शंकरगौडा पाटील, आमदार श्रीमंत पाटील, आमदार श्रीनिवास माने, भाजपच्या महिला विभागाच्या राज्य सचिव
उज्ज्वला बडवाणाचे, बेंगळूर येथील मराठा समाजाचे मंजुनाथ स्वामी, मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, राज्य उपाध्यक्ष निर्मल सुराणा यांनी दूरध्वनीवरून किरण जाधव यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर, सामाजिक कार्यकर्ते संजय कडोलकर, महेश खटावकर, पृथ्वीसिंग, सोनल सपकाळ, अभिषेक वेर्णेकर, प्रकाश कालकुंद्रीकर तसेच सकल मराठा समाज, बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघ, संभाजी नगर वडगाव येथील सार्वजनिक गणेश मंदिर सांस्कृतिक ट्रस्ट, ध. संभाजी युवक मंडळ, टिळकवाडी येथील महिला ज्येष्ठ नागरिक संघटना, टॅक्सी संघटना, संत गाडगेबाबा रजक समाज, विश्वकर्मा समाज, दैवज्ञ समाज, वृत्तपत्र विक्रेते, दलित संघटना तसेच कुस्तीगीर संघटना यांच्यासह गणेशोत्सव महामंडळाच्या कार्यकर्त्यांनी किरण जाधव यांना शुभेच्छा दिल्या.
समन्वय ब्लाइंड फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी केप कापून किरण जाधव यांच्यासमवेत वाढदिवस साजरा केला.