बेळगाव : हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर पब्लिक ट्रस्टच्या कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्याचा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी संपन्न झाला. नूतन अध्यक्ष चंद्रकांत बांडगी यांचे स्वागत मावळते अध्यक्ष अनंत लाड यांनी केले तर नूतन उपाध्यक्ष कुलदीप भेकणे यांचे स्वागत रघुनाथ बांडगी यांनी आणि नूतन चिटणीस प्रकाश माहेश्वरी यांचे स्वागत गोपाळराव बिर्जे यांनी केले. याप्रसंगी नव्या कार्यकारिणीच्या शुभेच्छापर अनेक ट्रस्टींची भाषणे झाली. याप्रसंगी सुनील चौगुले, विक्रम चिंडक, पूजारी बाळू किल्लेकर यांच्यासह इतर उपस्थित होते. अनंत लाड यांच्या कारकिर्दीत पुजारी निवासाची अनेक देणगीदारांच्या सहकाऱ्याने उभारणी करण्यात आली त्याबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले.
यंदाही दसरा साधेपणाने
घुमटमाळ मारुती मंदिरातर्फे दरवर्षी दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पण कोरोना मुळे गतसाली आणि यंदाही शुक्रवारी तो साधेपणाने साजरा केला जाणार आहे. मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असले तरीही भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन अध्यक्ष चंद्रकांत बांडगी व सहकार्यांनी केले आहे