Monday , December 8 2025
Breaking News

असह्य वृद्ध महिलेला एंजल फाउंडेशनने दिला मदतीचा हात

Spread the love

 

बेळगाव : एका असह्य वृद्ध महिलेला मदतीचा हात एंजल फाउंडेशनने दिला आहे. खानापूर येथील बुरुड गल्ली येथे एक वृद्ध महिला एकाच ठिकाणी अनेक दिवसांपासून बसून होती.

यावेळी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा मीनाताई बेनके येथून जात असताना त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली. यावेळी त्यांनी लागलीच वेळ न दडवता त्या वृद्ध महिलेला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

यावेळी सदर महिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होताच तिच्यावर उपचार करण्यात आले. बरे झाल्यानंतर त्यांना वृद्धाश्रममध्ये दाखल करण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्यासमवेत मिलन पवार, प्रवीण मुतगेकर, आकाश शहापूरकर, प्रज्ञा शिंदे, भारती बुडवी, अवधूत तुडयेकर, सायमन डिसोजा उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

भोवी वड्डर समाजाचा 17 डिसेंबर रोजी सुवर्णसौध समोर धरणे सत्याग्रह

Spread the love  बेळगाव : मागास जातींसाठीच्या आरक्षणाच्या बाबतीत न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या अहवालातील उणीवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *