बेळगाव : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला.
अज्ञात मृत व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 आहे. बेळगाव उज्वल नगर जवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना हा भीषण अपघात घडला. पुण्याहून बेंगळुरूच्या दिशेने निघालेल्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात व्यक्तीने धडक दिल्याची माहिती स्थानिकांनी दिली. अपघाताच्या धडकेने व्यक्तीच्या शरीराचा चुराडा झाला. रुग्णवाहिकेने मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात हलविण्यात आला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची तसेच अज्ञात वाहनाची ओळख पोलीस तपासातून होणे आवश्यक आहे.
Belgaum Varta Belgaum Varta