Friday , March 6 2026
Breaking News

शनी अमावस्या निमित्त शनी मंदिरात उद्या विविध कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : शनिवार दि. २१ जानेवारी रोजी शनी अमावस्या असून त्या निमित्त पाटील गल्ली येथील श्री शनेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आठ आणि दुपारी एक वाजता तैलाभिषेक करण्यात येणार आहेत. दुपारी दोन वाजता महापूजा आणि महाआरती करण्यात येणार आहे. याशिवाय शनी होम, शनी शांती, अष्टोत्तर आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात येणार आहेत. सकाळपासून मंदिरात प्रसाद वितरण करण्यात येणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता पालखी सेवा होणार आहे.

शनी अमावस्येच्या दिवशी शनी महाराजांचे दर्शन घेणे शुभदायी मानले जाते. भक्तांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा, असे मंदिरातर्फे कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *