Friday , March 6 2026
Breaking News

सेवंतीभाई शहा यांचे निधन

Spread the love

 

शहापूर मुक्तीधाम येथे सकाळी अंत्यसंस्कार
बेळगाव : मंगळवार पेठ. टिळकवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक सेवंतीभाई चतुरदास शहा (वय ८६) यांचे मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी सकाळी १० वाजता अंत्ययात्रा निघणार असून शहापूर मुक्तीधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सेवंतीभाई शहा बेळगावमधील अनेक संस्थांमध्ये सक्रिय होते. लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे संचालक ते होते. एसकेई सोसायटीचे अध्यक्ष, जैन श्वेतांबर संघाचे माजी अध्यक्ष, जी. जी. चिटणीस शाळेचे माजी अध्यक्ष, सिटीझन फोरम आदी विविध संस्थेमध्ये त्यांनी काम केले.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *