
बेळगाव : अनगोळ येथील संतमीरा शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विविध स्पर्धा, मान्यवरांची भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत होत्या.
अनगोळ येथील संतमीरा शाळेतर्फे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन 20 जानेवारीला आयोजित करण्यात आले होते. नियोजित कार्यक्रमाला उद्योजिका प्रिया पुराणिक, परमेश्वर हेगडे व किशोर काकडे आदी उपस्थिती होते.
यावेळी डॉ. सरनोबत यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. त्यांनी विद्यार्थांना शारीरिक, मानसिक आणि सामाजिक व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध स्वरूपाची पात्रे व लक्षवेधी नृत्य सादर केली. यावेळी मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta