
बेळगाव : तानाजी गल्ली महिला मंडळ हळदी कुंकू समारंभ दि.२६/०१/२३ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त तानाजी गल्ली महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकू समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमती शीतल कंग्राळकर ग्रुपने ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एंजल फाउंडेशच्या सौ. मीना बेनके व वॉर्ड क्र.९ च्या नगरसेविका सौ. पुजा पाटील व सौ.राजश्री रंगोली उपस्थित. सर्व मान्यवरांनी हळदी कुंकू कार्यक्रमावर आपले मनोगत व्यक्त केले.
सुत्रसंचालन माजी नगरसेविका सौ. वैशाली हुलजी यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना सौ.अंजली घसारी यांनी केली. आभार प्रदर्शन सौ. राजलक्ष्मी देसाई यांनी केले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गल्लीत पन्हाळा गडाची प्रतिकृती साकारलेल्या बालचमु मुलांना बक्षिसे देण्यात आली व गल्लीतील कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाच्या सदस्या सौ.रेवती चव्हाण, सौ.सुवर्णा मारिहाळकर, सौ.सरोजा जाधव, सौ.नीलम हेरेकर, सौ.अर्चना हुलजी, श्रीमती पदमा कामण्णाचे, सौ.नीता गोडसे, सौ.अश्विनी कंग्राळकर, सौ.प्रिया घसारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष श्रम घेतले. गल्लीतील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta