Tuesday , December 9 2025
Breaking News

विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मार्गदर्शनाची गरज : परमेश्वर हेगडे

Spread the love

 

बेळगाव : नववी आणि दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे वेळीच मार्गदर्शन लाभले तर विद्यार्थ्यांना अनुकूल होईल, असे मत विद्या भारती संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे यांनी व्यक्त केले.
बेळगावचे के. के. वेणुगोपाल हॉल येथे जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या जितोच्यावतीने नववी आणि दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षण या विषयावरील मार्गदर्शनाच्या दहाव्या आवृत्तीचे उद्घाटन करताना ते म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक युगात कोणतेही शिक्षण घेतल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकते. कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक संधी आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दहावीनंतर कोणते शिक्षण घ्यायचे हे काळजीपूर्वक ठरवावे. तुमच्या या निर्णयामुळे पुढील शिक्षणासाठी एक चांगले व्यासपीठ निर्माण होणार असून जितो संस्था गेली 10 वर्षे हे काम करत आहे हे कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमात बेळगाव विमानतळाचे संचालक राजेश मौर्य यांनी व्याख्यान देऊन विमान वाहतूक, विमानतळावरील नोकऱ्यांची उपलब्धता आणि ते मिळविण्यासाठी कोणते शिक्षण आवश्यक आहे आणि विमान वाहतूक क्षेत्रात भरपूर संधी याविषयी माहिती दिली.
या कार्यशाळेत आयटीबीपी कमांडंट रविकांत गौतम यांनी संरक्षण विभागातील सेवा आणि उपलब्ध संधी, वेतनश्रेणी, आवश्यक अभ्यासक्रम आणि शिक्षण, महिलांसाठीच्या विविध सेवा इत्यादींविषयी विद्यार्थ्यांशी माहिती दिली.
ज्येष्ठ वकील चेतना बिराज यांनी विद्यार्थ्यांना विधी सेवा, न्यायिक विभागातील पद, वेतनश्रेणी, पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता याबाबत विस्तृत माहिती दिली. दुसर्‍या व्याख्याता डॉ. पौर्णिमा पटनशेट्टी यांनी शिक्षण विभागातील मुबलक संधींबद्दल माहिती दिली.
या कार्यशाळेत बेळगावातील 500 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. जितो चेअरमन मुकेश पोरवाल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सचिव नितीन पोरवाल यांनी प्रास्ताविक केले. अभय आदिमानी अमिता शहा आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन

Spread the love  बेळगाव : बेळगावमध्ये कर्नाटक प्रशासनाकडून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर, शिवसैनिक आणि मराठी कार्यकर्त्यांवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *