बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय श्री कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे शनिवार दि. 4 ते 10 फेब्रूवारी हे 7 दिवस भगवतगीता अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला आहे.
इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर, शुक्रवार पेठ येथे रोज सायंकाळी 6.30 ते 8.30 पर्यन्त हिन्दी व इंग्रजी भाषेत आणि 11ते 16 फेब्रूवारी दरम्यान मराठी व कन्नडा भाषेत होणाऱ्या या अभ्यासक्रमात भगवद्गीता काय आहे? सुखाचा शोध व मनुष्य जीवनाचे महत्व, भगवान कोण आहेत? मी कोण आहे? आत्मा काय आहे? पुनर्जन्म ही एक कल्पना आहे की वास्तविकता? याच बरोबर चांगल्या लोकांच्या बरोबर वाईट का होते ? सर्वोत्तम योग कोणता? आणि व्यावहारिक जीवनामध्ये भगवद्गीतेचे उपयोग काय? या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
या अभ्यासवर्गात प्रवचन, लाईव्ह शो, व्हिडिओ, प्रश्न उत्तर बरोबरच महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा त्यासाठी 99018 47044 किंवा 9035530030 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन इस्कॉनच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta