बेळगाव (प्रतिनिधी) : समादेवी गल्लीतील समादेवीच्या जयंत्युत्सवाला आज शुक्रवारी भक्तीभावाने साजरा करण्यात आला. सकाळी चौघडा, काकड आरती, श्रीला महाभिषेक, श्रीला मिष्टान्न व महानैवेद्य, ओटी भरणे, असा भरगच्च कार्यक्रम उत्सवात पार पडला. श्रीला अभिषेक झाल्यानंतर रामकृष्ण अवलक्की या पुरोहित्याच्या मार्गदर्शनाखाली महाआरती करण्यात आली. संस्थेचे ट्रस्टी मोहन नाकाडी, मोतीचंद दोरकाडी, दीपक कलघटगी, अध्यक्ष दत्ता कणबर्गी, सचिव अमित कुडतूरकर, युवा अध्यक्ष रोहन जुवळी, सचिव रवि कलघटगी, महिला अध्यक्षा उज्वला बैलूर, सचिव लक्ष्मी बिडीकर आणि श्री समादेवी संस्थेच्या सभासदांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते श्रीला महाआरती करण्यात आली. दुपारच्या सत्रात पुराण वाचन, त्यानंतर सायंकाळी 4 वाजता श्रीच्या पालखी प्रदक्षिणाला प्रारंभ झाला. सुरुवातीला श्री समादेवी मंदिराला चार प्रदक्षिणा झाल्यानंतर पाचवी प्रदक्षिणाला समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, नार्वेकर गल्ली, पुन्हा श्री समादेवी मंदिराजवळ प्रदक्षिणाची समाप्ती झाली. वरील मार्गावर भक्तांनी देवीची ओटी भरून आरती केल्या. सायंकाळी झालेल्या बक्षिस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे दक्षिण विभागाचे आ. अभय पाटील, बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके, कर्नाटक देवालय संवर्धना समिती, राज्य संयोजक मनोहर मठद, विस्वस्त मोहन नाकाडी, मोतीचंद दोरकाडी, दीपक कलघटगी, अध्यक्ष दत्ता कणबर्गी, सचिव अमित कुडतूरकर, युवा अध्यक्ष रोहन जुवळी, सचिव रवि कलघटगी, महिला अध्यक्षा उज्वला बैलूर, सचिव लक्ष्मी बिडीकर यांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण व वयस्कर लोकांना कर्नाटक शासनातर्फे देण्यात येणाऱ्या पेन्शनची प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी श्रीच्या भंडारातील देवीला परिधान केलेल्या साड्या, खण, देवीसमोरील श्रीफळे लिलाव करण्यात आला. शनिवार दि. 4 रोजी नवचंडिका होम सकाळी 6.30 ते 11 वाजेपर्यंत होणार असून, दुपारी 12 ते 3 महाप्रसादाला प्रारंभ होईल.
Belgaum Varta Belgaum Varta