Friday , March 6 2026
Breaking News

श्री समादेवी जयंत्युत्सव : नवचंडिका होम, महाप्रसाद उत्साहात

Spread the love

 

बेळगाव (प्रतिनिधी) : समादेवी गल्लीतील श्री समादेवी संस्थान, वैश्‍यवाणी समाज, वैश्‍यवाणी युवा संघटना, वैश्‍यवाणी महिलामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी सकाळी नवचंडिका होमाला प्रारंभ झाला. मुख्य पूरोहित नागेश शास्त्री हेर्लेकर, ऋषीकेश हेर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवचंडिका होमाला प्रारंभ झाला. यावेळी अनिल श्रीधर कलघटगी व अक्षता अनिल कलघटगी या दांपत्यांनी नवचंडिका होम करण्याचा मान मिळविला. याप्रसंगी आनंद खरे, अभिषेक देशपांडे, दर्शन कुलकर्णी, पवन जोशी, पांडुरंग वडेर यांनी पुरोहिताचे काम पाहिले. दुपारी 12 वाजता समादेवी जयंत्युत्सव निमित्त सालाबादप्रमाणे महाप्रसादाला प्रारंभ झाला. प्रारंभी वैश्‍यवाणी समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबरकर, अनिता कणबरकर यांनी देवीला नैवेद्य दाखवून महाप्रसादला प्रारंभ केला. याप्रसंगी विश्‍वस्त मोहन नाकाडी, मोतीचंद दोरकाडी, दीपक कलघटगी, सेक्रेटरी अमित कुडतूरकर, युवा संघटना अध्यक्ष रोहन जुवळी, उपाध्यक्ष रवि कलघटगी, सुदेश पाटणकर, राहुल गावडे, परेश नार्वेकर, रोहन कलघटगी, सुरेश पानारी, रॉकेश कलघटगी, अमित गावडे, विनायक शहापूरकर, विक्रांत कुदळे, आनंद गावडे, गुरुदत्त सटवाणी, अमोल कपिलेश्‍वरी, महिला मंडळाच्या अध्यक्षा उज्वला बैलूर, मनिषा हणमशेट, जयश्री हणमशेट, सुनिता हणमशेट, लक्ष्मी बिडीकर, अश्‍विनी कलघटगी, प्रणाली कपिलेश्‍वरी, आदी कार्यकारी सदस्य उपस्थित होते. सात हजाराहून अधिक भक्तांनी महाप्रसादाला लाभ घेतला.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *