Friday , March 6 2026
Breaking News

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ शनिवारी

Spread the love

 

येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने रविवार (ता. 19) फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 18 व्या येळ्लूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचा मुहूर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम शनिवार (ता.11) रोजी सकाळी 8-30 वाजता परमेश्वर नगर येळ्ळूर येथील मराठी मुलांची शाळा येळ्ळूरवाडीच्या पटांगणात होणार आहे. 18 व्या येळ्लूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ बेळगावचे प्रसिद्ध उद्योजक अमर यल्लाप्पा अकणोजी व त्यांच्या पत्नी सौ. अमृता अमर अकणोजी यांच्या हस्ते रोवण्यात येणार आहे. तर या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून ॲड. शाम पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, माजी जिल्हा पंचायत सदस्य अर्जुनराव गोरल, माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, माजी एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कूगजी, ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर, दुधाप्पा बागेवाडी, प्रकाश अष्टेकर, शिवाजी सायनेकर, दत्ता उघाडे, प्रदीप मुरकुटे, उदय जाधव, किरण अण्णा पाटील, डी. जी. पाटील, अभियंते हणमंत कुगजी, रघुनाथ मुरकुटे, बाबुराव मुरकुटे, परशराम घाडी, दशरथ पाटील, प्रकाश विष्णू पाटील, गोविंद कालसेकर, वाय. सी.  गोरल, सतीश पाटील, राजकुमार पाटील, मल्लाप्पा कुंडेकर, दीपक कर्लेकर, नारायण काकतकर, प्रकाश तोपिनकट्टी, राजू पावले, डॉ. सतीश पाटील, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. पी. टी. मुचंडी, एम. बी. बाचीकर, बबन कानशिडे, अरुण धामणेकर, शिवाजी पाटील, शोभा निलजकर, मोहन पाटील यांच्यासह सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *