बेळगाव : दिनांक 08 फेब्रुवारी 2023 रोजी बेळगाव उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे भेट दिली व आश्वासनानुसार कणबर्गी गाव ते श्री सिद्धेश्वर मंदिरापर्यंत पाण्याची लाईन टाकण्यात आली आहे.
रहिवाशांच्या मागणीनुसार देवस्थान ट्रस्ट कमिटी आणि देवस्थानच्या प्रवेशद्वारावर काँक्रीटची उभारणी, पथदिवे बसवणे, भाविकांच्या वापरासाठी स्वच्छतागृहे, स्नानगृहे बांधणे आणि इतर मूलभूत गरजा पूर्ण करण्यात आल्या आहेत.
यावेळी आमदारांसमवेत श्री सिद्धेश्वर व्यवस्थापक मंडळ, श्री सिद्धेश्वर भक्त मंडळ, संजय सुंठकर, सिद्राय सांबरेकर, भावकाण्णा हिरोजी, अप्पय्या बिर्जे, मारुती पुजारी, सुबराव करडी, टोपण्णा अंतरगली व रहिवासी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta