बेळगाव : मराठी विद्यानिकेतन च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुरू करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले दत्तक योजनेला समाजातील दानशूर व्यक्ती, शाळेचे हितचिंतक व माजी विद्यार्थी भरभरून मदत करीत असतात.. या योजनेच्या माध्यमातून गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण शाळेकडून दिले जाते… तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणणे व चांगले शिक्षण व शैक्षणिक सुविधा पुरविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे… 2015 पासून ही योजना कार्यान्वित आहे.
यावेळी या योजनेसाठी शाळेचे हितचिंतक बेळगाव मधिल प्रसिद्ध उद्योजक श्री. शिवाजीराव विश्वासराव हंगिरकर यांनी ₹50000( पन्नास हजार रुपये) देणगी दिली… त्याचबरोबर शाळेची माजी विद्यार्थिनी सोनाली माने-कोंडूसकर हिने ₹10000/- ( दहा हजार रुपये) इतकी देणगी दिली… सोनाली माने सध्या बेंगलोर येथील आयटी कंपनीमध्ये कार्यरत आहे…
सामाजिक जाणिवेतून केलेल्या या मदतीबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री. सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष श्री. अनंतराव जाधव यांनी त्यांचे आभार व्यक्त केले… यावेळी शाळेचे संचालक श्री. किरण पाटील, शिक्षण संयोजिका नीला आपटे, मुख्याध्यापक नारायण उडकेकर, गजानन सावंत उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta