बेळगाव : महिन्याभरापूर्वी कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले आदर्श नगर राम कॉलनी येथील रहिवासी, नागेश यल्लाप्पा कुसाणे (वय 68) यांचे आज गुरुवारी सकाळी निधन झाले.
9 जानेवारी रोजी वडगाव स्मशानभूमी समोरील खुल्या जागेकडून घराकडे येत असताना, नागेश यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात नागेश गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले होते.
दरम्यान आज सकाळी नागेश यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात, वहिनी, तीन पुतण्या असा परिवार आहे. अवघ्या सहा दिवसांपूर्वीच नागेश यांच्या भावाचा मृत्यू झाला होता. आठवडाभरात घरातील दोन व्यक्तींचे निधन झाल्यामुळे कुसाणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागेश यांच्या निधनाची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी. कुसाणे कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
सोमवार दिनांक 13 रोजी सकाळी रक्षा विसर्जन होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta