खानापूर : अलीकडे खानापूर तालुक्यात व बेळगावात युवकांनी आत्महत्या केल्या. त्यावर एक आत्मचिंतन व उपाययोजनेची गरज आहे. डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नियती फाऊंडेशनच्या माध्यमातून मिशन “नो सुसाईड” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. येत्या काही दिवसात खानापूर तालुक्यात समुपदेशन करण्यात येणार आहे, असे डॉ. सोनाली सरनोबत यांनी सांगितले.
आत्महत्या रोखण्यासाठी डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नियती फाऊंडेशनच्या माध्यमातून मिशन “नो सुसाईड” हा उपक्रम खानापूर तालुक्यात लवकरच राबविणार. आत्महत्येच कारण अल्प आणि मध्यम उत्पन्न देखील असू शकते. अल्प आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशात 2019 मध्ये 77% आत्महत्या झाल्या आहेत. डिप्रेशन किंवा नैराश्य, मानसिक स्थितीत चढ-उतार, सतत चिंता किंवा अस्वस्थता, ज्या गोष्टीचा आनंद वाटतो वाटत होता आता त्या गोष्टीत रस नसणे, सतत मनात आत्महत्येचा विचार, भविष्याबद्दल निगेटिव्ह कल्पना यामुळे मनात आत्महत्येचा विचार येऊ शकतो. अशा स्थितीत मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तीला कुटुंबाची साथ महत्त्वाची असते. परिवारातील व्यक्तींनी अशा व्यक्तीसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात व त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने बोलावे. 15 ते 19 वर्षाच्या युवा पिढीमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. त्यांच्या मानसिक अवस्थेची कारणे जाणून घेऊन व त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांना आत्महत्या करण्यापासून रोखले पाहिजे.
आत्महतेच्या विचाराबाबत लोकांमध्ये अनेक प्रकारच्या गैरसमजुती आहेत. सामान्यांचा गैरसमज आहे की विचार किंवा परिस्थिती गंभीर होईपर्यंत लोकांच्या मनात आत्मतेचा विचार येत नाही. आत्महत्येचा विचार मनामध्ये केव्हाही येऊ शकतो. आत्महत्याबद्दल लोकांमध्ये असलेले गैरसमज कोणते याबाबत डॉ. सोनाली सरनोबत पुढे माहिती देतात.
आत्महत्येचा विचार फक्त लक्ष वेधण्यासाठी असतो. आत्महत्याबद्दल बोलल तरी इतरांना आयडिया मिळेल. वयोवृद्ध लोक त्यांच्या आजारामुळे किंवा घरातील वातावरणामुळे आत्महत्येचा जास्त विचार करतात. बऱ्याच वेळी हेल्पलाइनवर फोन करणारे आत्महत्येच्या विचाराबाबत व्यक्त होत नाहीत. अशावेळी तुम्ही आत्महत्येचा विचार करताय का? असा थेट प्रश्न विचारतो. याचा अर्थ आम्ही त्यांना कल्पना दिली असा होत नाही. आत्महत्येच्या विचारातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काय? आत्महत्या विचारातून बाहेर येण्यासाठी सुसाईड हेल्पलाइनची मदत समुपदेशन सकारात्मक विचार आणि वैद्यकीय मदत हे मार्ग आहेत. युवा वर्गाला आत्महत्येपासून दूर ठेवण्यासाठी नियती फाऊंडेशन काम करीत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta