बेळगाव : बडेकोळमठ येथील नागेंद्र महास्वामी यांची महाशिवरात्री निमित्त 17 फेब्रुवारी पासून यात्रा आयोजित करण्यात आली आहे. पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होतील. शुक्रवारी 17 रोजी सायंकाळी 4 वा. कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. शिवयोगी नागेंद्र स्वामींच्या संतिबस्तवाड येथील बसवेश्वर मंदिरापासून येणारा ध्वज, शिंदोळी येथील रामलिंगेश्वर मंदिरापासून बसवेश्वर गुरुसेवा भजनी मंडळातर्फे आणण्यात येणारा ध्वज एकत्र आल्यानंतर 5 वा. ध्वजारोहण करण्यात येणार आहे. शनिवारी 18 रोजी विश्वशांतीसाठी महारुद्राभिषेक सकाळी 9.30 वा. कल्लय्या शास्त्री उदेशीमठ व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सायंकाळी 4 वा. मास्तमर्डी येथील गौडा पाटील यांनी उभारलेल्या नागेंद्रस्वामी मंदिरापासून व तारिहाळ येथील रामलिंगेश्वर मंदिरातून पालख्यांचे आगमन होणार आहे. पालखी मिरवणुकीत परिसरातील भजनी मंडळे सहभागी होणार आहेत. सायंकाळी गिरीमल्ल महाराज सांबरा यांचे कीर्तन आणि श्री सिद्धेश्वर भजनी मंडळ हिरेबागेवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी 19 रोजी सकाळी 8 वा. महारुद्राभिषेक 11.30 पासून श्रींची पादपूजा, दु. 1 वा. रथोत्सव, दुपारी 2.30 वा. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
बलभीम युवक मंडळाने सायकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. संध्याकाळी 6.30 वा. हिरेबागेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री 10 वा. रसमंजिरी कार्यक्रम होणार आहे. सोमवारी 20 रोजी सकाळी 8 ते 1 पर्यंत भजनी मंडळांचा कार्यक्रम, 3 वा. हिरेबागेवाडी भाविकांच्या वतीने कुस्तीचे आयोजन केले आहे. मंगळवार दि. 21 रोजी सकाळी 10.30 वा. पालखी निघणार आहे. सायंकाळी 4 वा. ध्वज विसर्जनाने यात्रेची सांगता होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta