Wednesday , March 4 2026
Breaking News

5 मार्च रोजी बेळगाव मराठी साहित्य संमेलन

Spread the love

 

बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 5 मार्च 2023 रोजी “चौथे बेळगाव मराठी साहित्य संमेलन -2023” मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली.

बेळगाव जिल्हा कार्यकारिणी बैठक डी. बी. पाटील फोटो स्टुडिओच्या दालनात घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी रवींद्र पाटील होते.

या बैठकीत सर्वानुमते चौथे साहित्य संमेलन चार सत्रात घेण्याचे ठरविण्यात आले. पहिले सत्र ग्रंथ दिंडीने सुरुवात करून उद्घाटन व संमेलनाध्यक्ष भाषण, दुसरे सत्र – कथाकथन, तिसरे सत्र- कविसंमेलन व चौथे सत्र – मनोरंजनातून प्रबोधन
या चार सत्राचे नियोजन करण्याचे ठरविण्यात आले.

हे बेळगाव नगरीतील साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी परिषद व मराठा मंदिर कार्यकारणी प्रयत्नशील आहे.

यावेळी परिषदचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी. बी. पाटील, सचिव रणजित चौगुले, सुरज कणबरकर, संजय गुरव, अरुणा गोजे – पाटील, रोशनी हुंदरे, मनिषा नाडगौडा, संजिवनी खंडागळे, गीता घाडी, सविता वेसणे, नेत्रा मेणसे, स्मिता चिंचणीकर, स्मिता मेंडके यासह आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *