Wednesday , March 4 2026
Breaking News

वैश्यवाणी समाजाच्या वधू-वर व पालक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

 

बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना, वैश्यवानी महिला मंडळ समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दि. 19 रोजी वैश्य वाणी वधू वर व पालक मेळावा समाजाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी, प्रमुख अतिथी म्हणून अखिल गोमांतक वैश्य परिषदचे अध्यक्ष सुब्राय उर्फ सुभाष दीनानाथ शेठ- मसुरकर तर ट्रस्टी मोहन नाकाडी, वधू वर मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश पिळणकर, सचिव दीपक कलघटगी, सचिव अमित कुडतुरकर, सुदेस पाटणकर, वैशवाणी युवा संघटनेचे अध्यक्ष रोहन जुळवी, वैश्य वाणी महिला मंडळाचे अध्यक्ष उज्वला बैलूर, उपाध्याक्षा जयश्री हणमशेठ यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रारंभी अध्यक्ष दत्ता कणबर्गी यांनी उपस्थित यांचे स्वागत केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते, श्री समादेवी फोटोला, समाजाचे गुरु श्री. श्री. श्री. वामनाश्रम, फोटोला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फोटोला हार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे व व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आली. यावेळी या वधू-वर मेळाव्यात कर्नाटक गोवा महाराष्ट्र येथील 100 हून अधिक मुलामुलींनी व पालकांनी भाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळच्या सत्रात बाहेरगावाहून आलेल्या पालकांनी आपल्या वधू वर मेळाव्यासाठी आलेल्या मुला मुलींची नावे नोंदविली. दुपारच्या सत्रात वधू वर मेळाव्याला प्रारंभ झाला. त्यानंतर सायंकाळी या वधू वर व पालकांच्या मेळाव्याची सांगता झाली. कार्यक्रमाची सूत्रसंचालन प्रसाद निखार्गे यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *