बेळगाव : आपण देव देवतांना मानणारे आहोत. आपले 36 कोटी देव आहेत त्यामुळे मराठा समाज हा देव देवतांना मानणारा समाज आहे. त्यामुळे मंदिराची उभारणी करुन देवाची प्रतिष्ठापना केली जाते. मंदिरामधून आपल्याला ऊर्जा शक्ती मिळते आणि मंदिरामध्ये सर्वजण एकत्र येऊन त्या ठिकाणी आपली एकीची भावना दाखवणे हा त्यामागचा एक भाव आहे आणि देवाकडे येऊन आपण एकाग्रह होऊन ज्याप्रमाणे आपण देवा जो नतपस्तक होतो. त्याचप्रमाणे आज आपल्या समाजाने एकत्र येण्याची काळाची गरज आहे, असे प्रतिपादन म. ए समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी व्यक्त केले.
महाशिवरात्रीनिमित्त मंडोळी येथे कलमेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाप्रसादाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी पत्ती बँकेचे चेअरमन नारायण दळवी हे होते.
दोन दिवस श्री कलमेश्वर मंदिरामध्ये पूजा अर्चा आणि शिवलिंग अभिषेक देवस्की पंच कमिटीच्या वतीने करण्यात आला तर दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर रात्री जागर भजनी करण्यात आले होते. यावेळी शाळेच्या मुलीनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाप्रसादाचे उद्घाटन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थिनींना बक्षीस वितरण समारंभ आर.एम. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गावातील प्रमुख अतिथी म्हणून कृष्णा बेळगावकर, बाळासाहेब कणबरकर, नारायण शिंदे, मारुती कणबरकर, आप्पा शिंदे, सचिन दळवी, शिवाजी पाटील, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा देवस्थान कमिटीच्या वतीने पुष्पहार आणि भगवा फेटा बांधून स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार बाळाणी पाटील यांनी केले.